आमदार माधवराव पाटील जवळगावकर
संस्थापक अध्यक्ष
पैनगंगा कयाधु नदीच्या तिरावर वसलेल्या हदगाव-हिमायतनगर तालुक्यात ८०% हुन अधिक लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे, औद्योगीकरनाचा प्रचंड अभाव असल्याने दिवसनदिवस प्रचंड बेरोजगारी वाढत आहे, रासायनिक खताचा बेसुमार वापर आणी पिकावर येत असलेली प्रचंड रोगराई यामुळे शेतीचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत चालले आहे, परीणामी युवा वर्गांना उदरनिर्वाहासाठी साठी जेमतेम मानधनात मोठ्या शहराकडे रोजगारासाठी जाव लागत आहे, यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शेतात पिकणाऱ्या मालावर शेतक-यांनी मूल्यवर्धन करायचे असल्यास कृषी उद्योग उभे होणे फार गरजेचे आहे, त्यानुषंगाने सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक मध्ये उखळाई ग्रुप ऑफ अग्रो इंडस्ट्रीज अंतर्गत कृषी पर्व (वाटचाल शेतितून समृद्धी कडे) ची मी स्थापना केली या माध्यमातुन शेतक-यांच्या शेतातील काडीकचरा पासुन ते पिकणाऱ्या प्रत्येक मालावार शेतक-यांच्याच मालकीचे मोठे उद्योग उभे करून मूल्यवर्धन करण्यात येणार आहे, यामुळे भव्य रोजगार निर्मिती सह शेतक-यांच्या मालाला अधिक भाव देण्यास आम्ही सार्थ ठरू..!
अनिता माधवराव पाटील जवळगावकर
चेअरमन
दिवसेदिवस वाढती लोकसंख्या, पर्यावरनातील असमतोल, बेरोजगारी, प्रदुषण आणि आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी यामुळे असंख्य कुटुंबाना हालाखीचे जीवन तर गरिबी चा सामना करावा लागत आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकमेव शेतीतून समृद्धी कडे हां पर्याय आहे यास अनुसरून आम्ही “उखळाई ग्रुप ऑफ़ अग्रो इंडस्ट्रीज” च्या माध्यमातुन कृषि पर्वाची महत्वपुर्ण रचना केली आहे, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर गावातील शेतकऱ्याना शेतीस लागणारे सर्व साहीत्य, शेतात पिकनाऱ्या प्रत्येक मालावर गावातच प्रक्रीया करुण भव्य रोजगार निर्मिती सह शेतमालाला अधिकचा दर मिळवुन देत शेतक-याना उधोजक बनबने हां माझा उद्देश आहे..!
नेहा माधवराव पाटील जवळगावकर
मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रत्येक गावात कृषी पर्व ग्रामउधोजक निर्माण केला आहे. ग्रामउधोजक मार्फत गावपातळीवर होनाऱ्या प्रार्थमिक प्रक्रिये नंतर मालाचे मुल्यवर्धन, विक्री, तसेच इतर व्यवस्थापनाकरीता शेतक-यांच्या विशिष्ट उद्देशनिहाय जसे खाद्यतेल, दालविकास, दूधविकास, उसविकास, अन्नप्रक्रिया, बियाने, सेंद्रिय खते, शेतीउत्पादने, इंधन अशा विविध कंपनी ची स्थापना करण्यात आली असुन उधोग उभारनी करीता लागनाऱ्या मुलभुत गरजा जसे औधोगिक जमींन विज, पानी, शासकीय परवानगी उपलब्ध करुण देण्यात आले आहे. यातील शेतक-यांनी मुल्यावार्धित केलेल्या अन्नधान्यास विशेष दर्जा निर्माण करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही स्वतंत्र प्रणाली उभी केली आहे, सर्व सुविधा उपलब्ध तेच्या माध्यमातुन कृषि औद्योगिक क्रांती घडवून आनन्याचा मानस आहे..!
सतीश कोंडीबाराव पाटील खानसोळे
कार्यकारी संचालक
तंत्रज्ञान प्रत्येक उद्योगात क्रांती घडवत आहे आणि शेती क्षेत्रही यास अपवाद नाही, आम्ही प्रत्येक गावात एक वर्तुळाकार औद्योगिक अर्थव्यवस्था तयार करत आहोत, शेती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, शेतक-यांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी व्यावसायिकदृष्ट्या स्वयं शाश्वत मॉडेल तयार केले आहे. कृषी उद्योगातील उदयोन्मुख ट्रेंड ओळखुन ग्राहकाच्या पसंती, तांत्रिक प्रगती आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब करून आमच्या उखळाई ग्रुप ऑफ अग्रो इंडस्ट्रीज मार्फत उच्च मागणी असलेले गुणवतापुर्ण अन्नधान्य आकर्षित पैकिंग सह विकसित करणे, मानवी आरोग्यास लागणाऱ्या जवळपास १०० हून अधिक अन्नधान्य उत्पादनाचा विस्तार करून ग्राहकांच्या स्वास्थ्य निगडीत विकसनशील गरजा पुर्ण करण्यात वचनबद्ध आहोत..!